जळगाव : सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश नामदेव मेढे यांच्या आयोध्या नगरातील घरातील चोरी प्रकरणात घरातील चादरीवरील गुटख्याची थुंकी ही गुन्ह्यात अटक केलेल्या राजेंद्र उर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव (३०, रा.वाघ नगर, ह.मु.इंदूर, मध्यप्रदेश) व त्याचा सहकारी अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील (२४, रा.कानळदा, ता.जळगाव) या दोघांचे थुंकी व रक्ताचे नमुने एकमेकांशी जुळून आले आहेत. या गुन्ह्यातील चादर पोलिसांनी जप्त केली होती व दोघं संशयितांची थुंकी तसेच रक्त डीएनएसाठी नाशिकच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला.नाशिक येथे स्थायिक असलेले सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश मेढे यांचे अयोध्या नगरातील सदगुरु नगरात प्लॉट क्र.१९ मध्ये घर आहे. १८ जुलै २०१९ रोजीच्या रात्री मेढे यांच्याकडे धाडसी घरफोडी झाली होती. त्यात ५१ हजार रुपये रोख व सोने चांदीचे दागिने चोरी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी आनंदसिंग पाटील यांनी केलेल्या चौकशीत ही घरफोडी राजेंद्र उर्फ सोपराजा दत्तात्रय गुरव (३०) व त्याचा सहकारी अजय उर्फ शाहरुख हिरालाल पाटील (२४) या दोघांनी केल्याचे उघड झाले होते.आनंदसिंग पाटील यांनी दोघांना ९ जुलै २०१९ रोजी अटक केली होती. तपासात दोघांनी गुन्ह्याची कबुली देतानाच चोरीतील काही मुद्देमाल काढून दिला होता. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपींविरुध्द ठोस पुरावा उपलब्ध व्हावा यासाठी घटनास्थळावर चादरीवर गुटख्याची थुंकी आढळून आल्याने ही चादर गुन्ह्यात जप्त करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने या चादरवरील थुंकी व आरोपींची थुंकी त्याशिवाय दोघांचे रक्त असे डीएनएसाठी नाशिकच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त झाला. घरफोडीच्या गुन्ह्यात प्रथमच आरोपींची थुंकी व रक्त डीएनएसाठी पाठविण्यात आले होते.
सोपराजा सराईत गुन्हेगारसोपराजा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला चार, एमआयडीसी पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय रामानंद नगर पोलिसांनी त्याला हद्दपारही केले होते. ३१ मे २०१८ पासून जिल्ह्यातून २ वर्षासाठी त्याला हद्दपार करण्यात आले होते. मात्र हद्दपार असतानाही त्याने शहरात गुन्हे केले. आता तो जामीनावर असून त्याचा साथीदार अजय हा अजूनही कारागृहात आहे. दरम्यान, दोषारोपासोबत डीएनएचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार असल्याची माहिती तपासाधिकारी आनंदसिंग पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.
Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी