नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरातून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीला पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी पकडल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी दिली आहे. आरोपीकडून चोरी केलेले मोबाईल हस्तगत केले असून आरोपीचे कोणी साथीदार किंवा अजून कुठे चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहे.
पेल्हारच्या बिल्डींग नंबर १५, रिलायबल बिल्डींग येथे राहणारे विनोद यादव व साक्षीदार यांचे राहते घराचे दरवाजे व खिडक्या कशाचे तरी सहाय्याने उचकटुन २० मे रोजी चोरट्याने आत प्रवेश करुन त्यांचे घरातील ५४ हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन चोरून नेले होते. पेल्हार पोलिसांनी २२ मे रोजी गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदार यांचेमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी अब्दुल रेहमान ताहिर वडू याला ताब्यात घेवुन तपास केल्यावर गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली. त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले एकुण ५४ हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन असा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, रोशन पुरकर, किरण आव्हाड, बालाजी गायकवाड यांनी केली आहे.