अकोले (जि. अहमदनगर) : येथील एस. टी. बस आगारात सेवेत असलेला वाहक गणपत मारूती इदे (वय ३५, रा. मुतखेल ता. अकोले यांनी माळशेज घाटात कड्यावरून उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली, आत्महत्येचे कारण समजू शकेल नाही.
इदे हे आडीच तीन वर्षांपासून अकोले डेपोत वाहक पदावर कार्यरत होते. मंगळवारी ते अकोले कल्याण गाडी घेवून कल्याण येथे गेले होते. आज ते कल्याण अकोले गाडी घेवून परतणार होते. बुधवारी सकाळी माळशेज घाटात कपरीच्या महादेव मंदिर जवळ गाडी थांबली, माळशेज घाटात काम चालू असल्याने बहुतेक गाड्या या ठिकाणी थांबा घेतात. गाडी थांबल्यानंतर प्रवाशांबरोबर इदे खाली उतरले आणि त्यांनी कड्यावरून खोल दरीत (७००- ८०० फूट )उडी घेऊन आत्महत्या केली.
इदे यांचे मुतखेल गाव भंडारदरा धरणाच्या पाणलोट काठावर आहे. तेथे बोटींग , हाॅटेल व्यवसायात कुटुंब असल्याने आर्थिक परिस्थिती बरी आहे. पण त्यांचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या निधनाने दोन चिमुकल्या मुलांचे पिञुछत्र हरपले आहे.