शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

उद्योगपती हर्षद ठक्कर बेपत्ता; दादर पोलिसांचा तपास सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:45 PM

मरिन ड्राईव्ह येथे सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु 

मुंबई - आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने २ ऑक्टोबरपासून हर्षद ठक्कर घरी गेलेच नाहीत. आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेड ही कंपनी देशभरात अंतर्वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे. दादर पोलीस हर्षद ठक्कर यांचा शोध घेत आहे. ठक्कर कुटुंबीय, नातेवाईक, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि मित्रांकडे चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. ७ ऑक्टोबरला मरिन ड्राईव्ह येथे एक अज्ञात मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे समजते. ठक्कर कुटुंबीयांच्या डीएनएचे नमुने घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

२ ऑक्टोबरला हर्षद शेवटचे दादर येथील पॅसिफिक प्लाझा या इमारतीतील कार्यालयात दिसले. त्यावेळी निघण्यापूर्वी त्यांनी मोबाईल, पाकिट आणि पासपोर्ट कार्यालयात ठेवून दिले. यासोबत त्यांनी एक गुजराती भाषेत चिठ्ठी देखील ठेवली होती. कंपनीच्या शेअर्ससाठी मी माझी संपत्ती गहाण ठेवली आहे. शेअर बाजारातील काही लोक कंपनीविरोधात काम करत आहे. यामुळेच कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मला कोणाकडूनही काहीच नको आहे. माझं काय होईल याची मला कल्पना नाही. पण मला सर्वांनी माफ करा. अनेक गुंतवणूकदारांच्या नुकसानासाठी मी कारणीभूत आहे. हे मला सहन होत नाही. मी कधीही कोणाची फसवणूक केलेली नाही. माझ्या विम्यातून येणारी रक्कम कंपनीला द्यावी, असे चिट्ठीत लिहिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंshare marketशेअर बाजार