शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

व्यावसायिकाची गोळी घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 5:15 AM

तळवळीतली घटना : व्यावसायिक वादातून हत्या झाल्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकाची गोळी घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी तळवली येथे घडली. यामध्ये आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडामागे व्यावसायिक वादाचे कारण समोर येत आहे. प्रवीण तायडे असे गोळी लागून मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.घणसोली सेक्टर २१ (तळवली) येथे त्याचे बांधकाम सुरू आहे. मुख्य व्यावसायिकांकडून काम घेऊन तो बांधकाम करण्याचे काम करायचा. बांधकामाची साईट मिळविण्यावरून त्याची आणि काही स्थानिक बांधकाम व्यावसायिकांत चढाओढ असायची. याच प्रकारातून घणसोली सेक्टर २१ मधीलच काही भूखंड विकसित करण्याचे काम मिळविण्यावरून तायडेचे काही जणांसोबत वाद सुरू होते. याच वादातून गुरुवारी त्याची हत्या झाल्याची शक्यता आहे.गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण तायडे हा एका साथीदारासोबत दुचाकवीवरून चालला होता. या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. मारेकऱ्यांपैकी एकाने तायडेवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एक गोळी तायडेच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदारालाही गोळी लागली असून तो जखमी अवस्थेत पडला असता हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर परिसरातील व्यक्तींनी पोलिसांना कळविले असता गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तपास पथकांसह घटनास्थळी भेट दिली.संपर्कातील व्यक्तींकडे चौकशीगुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. तर हत्येमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तायडेच्या संपर्कातील व्यक्तींकडेही पोलीस चौकशी करीत आहेत.