पुणे : ओळखीने उधारीवर घेतलेल्या मालाचे पैसे दिल्यानंतर ते पूर्वीच्या हिशोबात वळते करुन घेऊन १७ हजार रुपयांच्या मालांवर ५ लाख रुपयांची मागणी करुन व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न कर्वेरोडवर घडला आहे़. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका व्यापाऱ्यासह दोघांना अटक केली आहे़. सुजित जेठमल सोलंकी (वय ३९, रा़ कर्वे रोड, नळस्टॉप) राजु शिवाजी मेटकरी (वय २२, रा़. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी संतोष बाबुलाल बाहेती (वय ४५, रा़ वारजे) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संतोष बाहेती यांचे कर्वे रोडवर दुकान आहे़. त्यांनी रणजित सोलंकी यांच्या ओळखीने बोहरी आळीतील पारस ट्रेडिंग कंपनी या दुकानातून १७ हजार रुपयांच्या रंगपंचमीच्या पिचकाऱ्या उधारीवर घेतल्या होत्या़. एप्रिल २०१९ मध्ये ठरल्याप्रमाणे त्यांनी १७ हजार रुपयांच्या बदल्यात २० हजार रुपये रणजित सोलंकी यांना दिले होते़. परंतु, त्यांचा जुन्या हिशोबातील पैसे बाकी असल्याने त्यांनी ते पैसे पारस ट्रेडिंगला न देता जुन्या हिशोबात वळते करुन घेतले़. त्यामुळे पारस ट्रेडिंगच्या मालकांनी सुजितच्या वडिलांना फोन करुन संतोष बाहेती यांच्याकडून पैसे वसुल करण्याचे काम रणजितचा भाऊ सुजितकडे सोपविले़. त्यानंतर सुजित याने फोन करुन धमकाविण्यास सुरुवात केली़. संतोष बाहेती नेहमीप्रमाणे २२ ऑगस्टला दुपारी ३ वाजता भावाच्या दुकानाबाहेर थांबले असताना सुजित व त्याचे दोन साथीदार आले़. त्यांनी १७ हजार रुपये व त्यावरील दंड म्हणून ५ लाख रुपयांची मागणी केली़. त्यांना त्याने सायंकाळपर्यंत पैसे देतो, असे सांगितले़. त्या तिघांनी संतोष यांना पकडून नळस्टॉप चौकात नेले़. तेथे एका मोटारीत जबरदस्तीने बसवून चांदणी चौकात नेले़. तेथे शिवीगाळ करीत पैशाची मागणी करु लागले़. त्यांनी उरवडे येथील एका शेताजवळ मोटार थांबवून खाली उतरविले़. सुजित याने हॉकी स्टीकने मारहाण केली़. इतरांनी लोखंडी पाईपाने मारहाण करुन एकाने त्यांच्या डोळ्यात बोट घातले़. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडातून रक्त आले़. त्यांच्या मोबाईल व दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेतली़. पुन्हा मोटारीत बसवून त्यांना सुरीचे उलट्या बाजूने मारहाण करुन पैसे दिले नाही तर खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली़. त्यानंतर त्यांना पौड रोडवरील कृष्णा हॉस्पिटलजवळ सोडून दिले़. .....दिवसाला डबल पैशांचीमागणीसुजित याने संतोष बाहेती यांना फोन करुन आज पैसे दिले तर १७ हजार रुपये़ आज दिले नाही तर उद्या ३४ हजार रुपये असे प्रत्येक दिवशी डबल पैशाची मागणी करुन लागला़ त्यानंतर त्यान फोन करुन १ आॅगस्ट रोजी १ लाख ३० हजार रुपये व १० आॅगस्टला १ लाख ३० हजार रुपये दे मग हिशोब पूर्ण होईल, असे फोन करुन सांगितले़ बाहेती १ व १० तारखेला त्याच्या मागणीप्रमाणे पैसे देऊ शकले नाहीत़ म्हणून तो त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन लागला होता़
उधारीचे पैसे न दिल्याने व्यापाऱ्याचे अपहरण करुन मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 4:38 PM
त्यांनी १७ हजार रुपये व त्यावरील दंड म्हणून ५ लाख रुपयांची मागणी केली़. त्यांना त्याने सायंकाळपर्यंत पैसे देतो, असे सांगितले़...
ठळक मुद्दे१७ हजारांच्या मालाचे ५ लाखांची मागणी : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल