शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

व्यावसायिकाचा गळा चिरला; कट लागल्याच्या वादातून एकवीरा चाैकात थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 8:21 PM

Attempt to Murder Case : दाेन तरुणांनी वेळेचे भान राखत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने जखमीचे प्राण वाचले.

ठळक मुद्दे पंकज शहा (४५) रा. उज्ज्वल नगर असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर आराेपी विक्की पाेंगाडे (२४) रा. साने गुरुजी नगर लाेहारा, सुरश श्यामकुंवर ऊर्फ शूटर (२८) रा. सिंचन नगर व लाेहारा येथील एकाने  हल्ला केला.  

यवतमाळ :  शहरातील भाईगिरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला करण्याचे काहीच वाटत नाही. शनिवारी मध्यरात्री एकवीरा चाैकात दुचाकीचा कट लागला म्हणून ऑटाेडील व्यावसायिकाचा तिघांनी गळा चिरला. हा व्यावसायिक जखमी अवस्थेत कसाबसा तेथून पळाला. गळ्यातून रक्ताची धार सुरू असताना त्यांने मेडिकल चाैकापर्यंत प्रवास केला. नंतर ताे येथील खानावळीत दुचाकीसह धडकला. दाेन तरुणांनी वेळेचे भान राखत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने जखमीचे प्राण वाचले.पंकज शहा (४५) रा. उज्ज्वल नगर असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर आराेपी विक्की पाेंगाडे (२४) रा. साने गुरुजी नगर लाेहारा, सुरश श्यामकुंवर ऊर्फ शूटर (२८) रा. सिंचन नगर व लाेहारा येथील एकाने  हल्ला केला.   हे तिन्ही आराेपी एकवीरा चाैकातून जात हाेते. दरम्यान, त्यांनी दुचाकीला कट लागला यावरून पंकज शहा याच्याशी वाद घातला. या वादात आराेपीने पंकजच्या गालावर व गळ्यावर चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पाेलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे,शाेध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी तक्रारार येण्यापूर्वीच तत्काळ संशयित आराेपींचा शाेध सुरू केला. घटनेनंतर काही तासातच गुन्ह्यातील तिन्ही आराेपींना अटक केली. तक्रार आल्यानंतर आरोपी विराेधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पंकज शहा यांचा मागील दिवाळीच्या एक दिवस आधी आर्णी मार्गावर मोठा अपघात झाला हाेता. यात त्याच्या दाेन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. पकंज अपघातातून सुखरूप बचावला हाेता.गंभीर अवस्थेत एकवीरा चाैक ते मेडिकल चाैक प्रवासघटनास्थळावरून पंकजने कशीबशी सुटका करून घेत  दुचाकीने पळ काढला. रक्ताची धार सुरू असताना पंकज थेट शासकीय रुग्णालयाकडे निघाला. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने ताे चालत्या दुचाकीवरच बेशुध्द झाला. तो दुचाकीसह मेडिकल चाैक परिसरातील एका खानावळीत शिरला. नेमका काय प्रकार आहे हे तेथील नागरिकांच्या लक्षात आला नाही. दारूच्या नशेत अपघात झाला असे उपस्थितांना वाटले. त्यामुळे काेणीच मदतीसाठी पुढे येत नव्हते. हा प्रकार तेथून जाणाऱ्या ललित जैन याच्या निर्दशनास आला त्याने तत्काळ आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने पंकजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी लगेच शस्त्रक्रिया करून पंकजचे प्राण वाचविले. नंतर घटनेची माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिसArrestअटक