प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कॉल गर्लने सरकारी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला अटक करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. दरम्यान, कॉल गर्ल आधी आझमगडहून प्रयागराजला आली होती, तिथे तिने दुसऱ्या तरुणाशी लग्न केले आणि नंतर सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. दरम्यान, दोघांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद सुरू झाला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
सेक्स रॅकेटच्या व्यवसायात सहभागी असलेल्या एका तरुणीला आझमगड पोलिसांनी पकडले होते. काही दिवसांपूर्वी ही तरुणी प्रयागराजला आली होती. याठिकाणी तिने एका व्यक्तीशी लग्नही केले होते. त्यानंतर या तरुणीची आणि एका सरकारी कर्मचाऱ्याची भेट झाली. सरकारी कर्मचाऱ्याची तरुणीशी जवळीक वाढू लागली. यानंतर तरुणीने आपल्या पतीपासून दूर राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, सरकारी कर्मचारी या तरुणीच्या प्रेमात अडकला. यानंतर सरकारी कर्मचारी आणि तरुणीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले.
दरम्यान, या सरकारी कर्मचाऱ्याच्या पत्नीचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. पत्नीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी तरुणी (कॉल गर्ल) तिथे पोहोचली आणि स्वतःला सरकारी कर्मचाऱ्याची पत्नी म्हणवून घेऊ लागली. हे ऐकून तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले आणि या प्रकरणावरून वाद वाढला. यावेळी तरुणीने आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा लोकांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला. यामुळे संतापलेल्या तरुणीने पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे, वाद वाढल्यावर सरकारी कर्मचाऱ्याने तरुणीपासून लांब राहण्यास सुरुवात केली. मात्र या तरुणीने त्याची पत्नी असल्याचा दावा केला होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यानंतर तरुणीने लूटमारसह आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार दाखल केली. मात्र, या दोघांचे सत्य पोलिसांना माहीत होते. यादरम्यान तरुणीने मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांना पत्र लिहून न्याय न मिळाल्यास धोकादायक पाऊल उचलू, अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्याला अटक करून कारागृहात रवानगी केली.