इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच एका व्यक्तीची ५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहेला. दरम्यान, या व्यक्तीकडून उबर (UBER) कॅब राइडसाठी १०० रुपये जास्त आकारले होते. त्यामुळे त्या व्यक्तीने गुगलद्वारे उबर कस्टमर केअर नंबर मिळवून, ते पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीला गुगलवर मिळालेला नंबर फेक निघाला. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये उकळले.
आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, पीडित व्यक्तीचे नाव प्रदीप चौधरी असे आहे. ते एसजे एन्क्लेव्हचा रहिवासी आहेत. त्यांनी गुरुग्रामला जाण्यासाठी २०५ रुपयांत उबर कॅब बुक केली, परंतु उबरने त्यांच्याकडून ३१८ रुपये घेतले. एफआयआरनुसार, चालकाने चौधरी यांना कस्टमर केअरला फोन करून पैसे परत मिळू शकतात, असे सुचवले होते. प्रदीप चौधरी म्हणाले, "मला गुगलवरून नंबर मिळाला आणि मग राकेश मिश्राशी बोललो. त्याने मला गुगल प्ले स्टोअरवरून 'रस्ट डेस्क अॅप' डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मला पेटीएम उघडण्यास सांगितले आणि परताव्याच्या रकमेसाठी 'rfnd 112' असा मेसेज पाठवण्यास सांगितले."
दरम्यान, सुरुवातीला त्यांनी अतुल कुमारला ८३,७६० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर ४ लाख रुपये, २०,०१२ रुपये आणि ४९,१०१ रुपये असे व्यवहार केले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पेटीएमद्वारे ३ आणि पीएनबी बँकेद्वारे एक व्यवहार करण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ डी अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे, परंतु संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ही चूक कधीही करू नकाउबर कस्टमर केअरला कॉल करण्यासाठी, फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जा. कारण गुगलवर अनेक बनावट नंबर उपलब्ध आहेत. अधिकृत वेबसाइटवर दाखवलेली लिंक खरी आहे आणि वापरकर्त्यांना ते कसे संपर्कात राहू शकतात हे स्पष्टपणे सांगते.