पिंपरी : हॉटेलमध्ये हाऊस किपींगचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा लावला. हा प्रकार रविवारी (दि. ३) रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडी फेज एक येथील बी फाईव्ह रेस्टॉरंट येथे उघडकीस आला. हॉटेलचे व्यवस्थापक राकेश शेट्टी (वय ३५, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, राम देब नाथ (वय २४, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज एक येथे बी फाईव्ह रेस्टॉरंट हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये फिर्यादी राकेश व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर आरोपी राम हा हाऊस किपींगचे काम करतो. राम याने रविवारी रात्री हॉटेलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये मुलींचे व्हिडिओ काढण्याच्या उद्देशाने मोबाईल कॅमेरा सुरु करून ठेवला. हा प्रकार हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत
हाऊस किपींग कर्मचाऱ्याने ठेवला लेडीज वॉशरूममध्ये कॅमेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 7:09 PM
हॉटेलमध्ये हाऊस किपींगचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलांच्या वॉशरूममध्ये मोबाईल कॅमेरा लावला.
ठळक मुद्देहिंजवडी फेज एक येथे बी फाईव्ह रेस्टॉरंट हे हॉटेल