मुंबई - मुलुंड येथील वीणा नगर जंक्शनच्या अगोदर असलेल्या रुणवाल इमारतीत फार्मसी कार्यालय आहे. या कार्यालयात आज सकाळी चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं समोर येतं आहे. फार्मसीसाठी नोंदणी करण्याकरीत नोंदणी कार्यालयात उमेदवार आले होते. मुलुंडमध्ये हे एकमेव कार्यालय असल्याने महाराष्ट्र भरातून उमेदवार इथे दाखल झाले होते. घटना घडली त्यावेळी ५०० हून अधिक उमेदवार होते. या कार्यालयाबाहेर प्रवेशद्वारावर जवळपास ५०० उमेदवार जमा झाले होते. दरम्यान, पाऊस सुरु झाल्याने उमेदवारांकडे त्यांचे महत्वाचे कागदपत्र होती. ती भिजू नयेत म्हणून आलेले उमेदवार आपली कागदपत्र पावसात भिजू नये म्हणून प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा चेंगराचेंगरीची प्रकार घडला आहे. मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यात अनेकांना किरकोळ जखमा झाल्या असून यातील अनिकेत श्रृंगारे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले तर इतर तिघांवर अग्रवाल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
मुलुंडमध्ये फार्मसी नोंदणीसाठी आलेल्या उमेदवारांची झाली चेंगराचेंगरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 2:13 PM