हरियाणातील अंबाला येथे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका मुलीने रेंज रोव्हर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लाल रंगाच्या कारला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. एक महिला आणि दोन मुले जखमी आहेत. रेंज रोव्हर चालवणारी तरुणी दारूच्या नशेत होती, असा आरोप आहे. परंतु जेव्हा तिला वैद्यकीय चाचणी घेण्यास सांगितले. तेव्हा तिने वडिलांच्या येण्यापूर्वी कोणतीही चाचणी करण्यास नकार दिला आणि गोंधळ घातला.
पोलिसांना फटकारलेआरोपी मुलींनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आणि वकिलासह त्यांचे पालक येईपर्यंत पोलिसांना स्वत:ची कोणतीही माहिती न देण्यावर ठाम राहिल्या. महिला पोलिसांच्या मदतीने या दोन मुलींना अंबाला कॅन्टोन्मेंट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, तेथेही त्यांनी हायव्होल्टेज ड्रामा केला.
तिचा चेहरा लपवलायानंतर पोलीस ठाण्यात बसूनही त्यांची वागणुकीत फरक पडला नाही. त्यामुळे मीडियाचा कॅमेरा पाहून तिने आधी चेहरा लपवायला सुरुवात केली आणि मग उलट पोलिसांवरच आरोप करायला सुरुवात केली.
पोलिसांनाही मारहाण केलीअंबाला पोलिसांचे डीएसपी राम कुमार यांनी सांगितले की, मुलींवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. दोन्ही मुली दारूच्या नशेत असल्याचे समजत आहे. मुलीच्या कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलींनी पोलिसांवरही हल्ला केल्याचे डीएसपीने मान्य केले. आता पोलिसांनी दोघांवर कारवाई सुरू केली आहे.