मेक्सिको: अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात खतरनाक गुन्हेगार, गँगस्टर ज्याने शेकडो लोकांना अॅसिडमध्ये बुडवून मारले होते तो १० वर्षांनी तुरुंगाबाहेर येत आहे. सँटियागो मेजा लोपेज (Santiago Meza Lopez) हा एल पोजोलेरो किंवा द स्टीवमेकर या नावाने कुप्रसिद्ध आहे. त्याने असंख्य लोकांचे मृतदेह अॅसि़डमध्ये टाकून गायब केले होते, अशी कबुली पोलिसांना दिली होती. त्याला २००९ मध्ये अटक करण्यात आली होते. २०१२ मध्ये त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती आता पूर्ण होत आहे.
या वर्षी हा खतरनाक गँगस्टर तुरुंगातून बाहेर येणार आहे. मेक्सिको हा देश अमेरिकेत काळ्या धंद्यांसाठी, ड्रग्ज आणि अन्य अवैध धंद्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. स्वीवमेकरने सिनालोआ कार्टेलसाठी काम करताना हजारो लोकांना गायब करण्यासाठी कित्येक बॅरल अॅसिडचा वापर केला होता, असे सांगितले जाते. मेक्सिकोच्या तिजुआनामध्ये कमीत कमी १० ठिकाणी त्याचे या कृत्यासाठी अड्डे होते. यामध्ये त्याचा अमेरिकेच्या सीमेजवळचा चिकन कूप फार्मदेखील होता.
अॅसिडमध्ये मृतदेह टाकल्याने ते विरघळून जातात, यामुळे कोणालाच थांगपत्ता लागत नाही. त्याने याची फॅक्टरीच खोलली होती, असे म्हणण्यास हरकत नाही. हे वापरलेले अॅसिड फेकून देण्यासाठी त्यांना त्याची स्वत:ती ड्रेनेज सिस्टिम देखील तयार केली होती. पोलिसांनी अशा न विरघळलेल्या हजारो हाडांचे तुकडे ताब्यात घेतले होते. तसेच २०१२ पासून आजवर त्याच्या फार्ममधून 16,500 लीटर अॅसिडयुक्त चिखल आणि २०० किलो कचरा काढण्यात आला आहे.
न्यायालयीन कागदपत्रांद्वारे लोपेजने यासाठी कार्टेलने त्याच्यावर जबरदस्ती केली होती, हे सिद्ध केले होते. यामुळे त्याला एवढी कमी शिक्षा मिळाली होती. लोपेज १९९६ मध्ये शेतात काम करत असताना कार्टेलने त्याला तिथून उचलले होते. पाणी आणि अॅसिडने भरलेल्या ड्रममध्ये एका व्यक्तीचा तोडलेला पाय टाकून त्याला तिथे निरीक्षणासाठी बसविले होते. तो पाय जोवर विरघळून गायब होत नाही तोवर त्याला तिथे बसण्यास सांगितले होते. हा एक प्रयोग होता, जो नंतर दोघांनी वापरत हजारो लोकांचे बळी घेतले आणि त्यांना गायब केले.