शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला दणका; ११५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 6:21 AM

कंपनीने कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम बंद पडलेल्या काही बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांच्या मार्फत कंपनीच्या मालकीच्या दोन अन्य कंपन्यांत वळवली. या दोन्ही कंपन्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील विविध शेअर बाजारांत शेअर व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेल्या कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने दणका देत ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शनिवारी ईडीने केलेल्या या जप्तीमध्ये इमारती, भूखंड, काही कंपन्यांतील समभागांची गुंतवणूक, रोख रक्कम, परदेशी चलन, दागिने यांचा समावेश आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या ग्राहकांचे समभाग तारण ठेवत बँकाकडून २८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, सेबीने ग्राहकांचे समभाग तारण ठेवण्यास बंदी केल्यानंतर, कंपनीने घेतलेले २८०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत झाले. या प्रकरणी हैदराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हैदराबाद पोलिसांकडे दाखल तक्रारीच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असता कंपनीने अनेक गुंतागुंतीचे व्यवहार केल्याचे दिसून आले.

कंपनीने कर्जापोटी प्राप्त झालेली रक्कम बंद पडलेल्या काही बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांच्या मार्फत कंपनीच्या मालकीच्या दोन अन्य कंपन्यांत वळवली. या दोन्ही कंपन्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच हे पैसे या दोन कंपन्यांत वळविल्यानंतर या कंपन्यांवर असलेल्या कर्जाची परतफेड या पैशांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच, कंपनीचे अध्यक्ष सी. पार्थसारथी यांनी या दोन कंपन्यांमधून आपल्या दोन्ही मुलांची नेमणूक दाखवत त्यांना पगार तसेच घरगुती खर्चासाठी भत्त्यापोटी पैसे देण्यासही सुरुवात केली. या प्रकरणी बँकेकडून घेतलेल्या मूळ कर्जाची परतफेड न करता ते अवैधरीत्या अन्य उद्योगांत वळवत या पैशांचा वैयक्तिक लाभासाठी वापर केल्याचा ठपका ठेवत ईडीने कंपनीवर आणि कंपनीच्या अध्यक्षांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष सी. पार्थसारथी यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मात्र, तपासादरम्यान त्यांच्याकडील अन्य मालमत्तेचा तपशील प्राप्त झाल्यानंतर ईडीने शनिवारी त्यांची ११० कोटी रुपये मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वी कंपनीची १९८४ कोटी ८४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शनिवारी केलेल्या कारवाईनंतर कंपनीची आतापर्यंत एकूण २०९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे. अन्य दोन प्रकरणांत ५ कोटींची जप्ती

 ईडीने अन्य दोन प्रकरणांत केलेल्या कारवाईद्वारे ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.  यापैकी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीत सरव्यवस्थापक असलेल्या बाभेन मैत्रा या व्यक्तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून सुमारे १८ कोटी ७५ लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी कंपनीने त्याची २ कोटी ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर, पतपेढीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ओडीशामधील माजी आमदार प्रवत रंजन बिस्वल याची ३ कोटी ९२ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय