लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - एका दाम्पत्या कडून परदेशात गुंतवणूक व अडचणीचे कारण सांगून तब्बल ७४ लाख ४६ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या गणेश बाबू उभारे व त्याची पत्नी हरपीत उर्फ सोनू आणि मेव्हणा संदीप परमिंदर सिंग या तिघा सराईत ठकां विरुद्ध मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मीरारोडच्या शांती पार्क मध्ये राहणाऱ्या सुरेखा ( ४२ ) व त्यांचे पती अनील पवार यांच्या घरी २०११ मध्ये गणेश बाबु उभारे व त्याची पत्नी हरपीत उर्फ सोनू रा. साइ सृष्टी टाँवर ,न्यु गोल्डन नेस्ट रोड , भाईंदर पुर्व गेले होते . त्यावेळी गणेश ने कॅनडा येथे कामानिमीत्ताने जायचे २ लाख रुपये पवार यांच्या कडून उसने घेतले होते .
काही दिवसानी गणेश व हरपीत ने आम्ही कॅनडा मध्ये असून डायमंड गँलक्सी नावाचे कपंनीत गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे सांगितले . तसेच मुंबई ला परत आल्यावर तुम्हाला माझा फ्लॅट किंवा गावची जमीन तुमच्या नावावर करुन देणार सांगीतले होते. या दरम्यान संदीपने सुद्धा गणेश अडचणीत आल्याचे सांगून पैशांची मागणी केली . दागदागीन्याची विक्री करुन , गावच्या जमिनीचे आलेले पैसे आदी मोठ्या रकमा २०११ व २०१४ दरम्यान गणेशच्या खात्यात जमा केल्या . एकूण ७४ लाख ४६ हजार रुपये पवार दाम्पत्य व नातलगांनी ह्या त्रिकुटास दिले .
ऑगस्ट २०२० मध्ये पवार यांना गणेश उभारे हा भारतात असुन त्याचे विरुद्ध बोरीवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याबाबत वृतपत्रातील बातमी वरून समजले . त्यामुळे गणेश कडे विचारणा केल्या नंतर गणेश व हरपीत ने प्रत्येकी ५० लाखांचे ४ असे एकूण २ कोटींचे धनादेश पवार दाम्पत्यास दिले . परंतु नंतर गणेश सीबीआय मुंबई व बोरीवली पोलीस ठाणे यांनी त्यांचे विरुद्ध दाखल गुन्हायात अटक केल्याची माहीती मिऴाली. अखेर या त्रिकुटाने अपहार करुन फसवणुक केल्या प्रकरणी बुधवारी मीरारोड पोलीस ठाण्यात सुरेखा पवार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .