मीरारोड - दीर आपल्याला वाट्टेल तसा बोलतो याची तक्रार पतीकडे केल्यानंतर पती दिराला काही बोलत नसल्याने संतापलेल्या पत्नीने पतीला शिवीगाळ व धक्काबुक्की केलीच शिवाय दिरावर चाकूने वर करत दिव्यांग नणंदला सुद्धा धक्काबुक्की केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे.फिर्यादी हिम्मत रामचंद्र भाईर (३७) यांनी रविवार ९ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार त्याची पत्नी पूजा हिच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिम्मत हे भाईंदरच्या मुर्धा गावात राहतात . ते महापालिकेत ठेक्यावर कामाला असून त्यांचा लहान भरून मयूर हा देखील पालिकेत कामाला आहे. हिम्मतसह त्याची पत्नी पूजा, सव्वा वर्षाचा मुलगा विवान, भाऊ मयूर व दिव्यांग बहीण प्रमिला असे एकत्र राहतात. शनिवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ . ३० च्या सुमारास कामावरून घरी आल्यावर रात्री जेवण आटोपल्या नंतर पत्नी पुजा हिने पती कडे मोठ्या आवाजात ओरडून दीर मयूरची तक्रार सुरु केली. तुझा भाऊ मयुर हा मला, तु घरात जेवण बनवत नाहीस, काही कामे करत नाहीस, सारखी झोपुन असते असे का बोलला ? तुला त्याला समजावता येत नाही का ? त्याला मला बोलण्याचा काय अधिकार ते तुला समजत नाही का ? असे पूजा पतीला मोठमोठ्याने ओरडून सांगू लागली. हिम्मत यांनी पत्नीला शांत राहण्यास सांगितले व पत्नी आणि भावास समजावू लागला . त्याचा राग येऊन पूजा रागारागात स्वयंपाक घरात गेली आणि भाजी कापण्याचा चाकू घेवुन आली . चाकू दाखवत तिने पती व दिरास शिवीगाळी त्यांच्या अंगावर धावून गेली . त्यात मयूरच्या उजव्या हाताच्या चाकू मारल्याने जखम झाली . पती सोडवण्यास गेला असता त्याला सुध्दा धक्काबुकी करुन शिवीगाळ केली.पूजाने मुलगा विवान याला मारण्याचा प्रयत्न केला असता नणंद प्रमिला वाचवायला गेली म्हणून तिला देखील शिवीगाळी करुन मारहाण करण्याची धमकी दिली. हिम्मत व मयूर यांनी भाईंदरच्या भीमसेन रुग्णालयात जाऊन उपचार केले. पतीच्या फिर्यादीनंतर पत्नीवर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भाईंदर पोलीस नेमकी वस्तुस्थिती आणि घटना याचा तपास करत आहेत.
...म्हणून पत्नी रागावली! पतीसह नणंदेला धक्काबुक्की करून चाकूने वार करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 4:33 PM