मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या 'राजगृह' च्या आवारात तोडफोड केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करण्याची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भीमराव यशवंतराव आंबेडकर (६०) यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ४४७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल सायंकाळी ५ ते ५.३० वाजताच्यादरम्यान एका अनोळखी इसमाने राजगृह या माटुंगा पूर्व स्थित इमारतीच्या गार्डनमधील फुलझाडांच्या कुंड्या पडून नासधूस केली आणि इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, अन्य पुराव्यांच्या आधारे सध्या एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची पोलीस चौकशी करत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य