सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ नागराणी मंदिर परिसरात रविवारी दुपारी हरित देवनानी यांनी श्वानाला जीवे ठार मारल्याचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. प्राणीमित्र हरित देवनानी सृष्टी चुग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीराम परिसरात सृष्टी चुग राहत असून त्या प्राणीमित्र आहेत. रविवारी दुपारी एका कुत्र्याला निर्दयपणे जिवे ठार मारल्याचा प्रकार माहीत पडल्यावर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. श्वानाला जिवे ठार मारल्याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी हरित देवनानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.