शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

मीरारोड: भाजपच्या माजी युवाध्यक्षासह साथीदारांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमके प्रकरण 

By धीरज परब | Published: September 03, 2022 6:09 PM

भाजपच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष निलेश सोनी सह त्याच्या २४ ते २९ साथीदारांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - एका भूखंडावरील कब्जा हटवून देण्यासाठी पैसे घेतल्यावर आणखी मागितलेले पैसे न मिळाल्याने एकावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून बेदम मारहाण केल्या प्रकरणी भाजपच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष निलेश सोनी सह त्याच्या २४ ते २९ साथीदारांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . 

मीरारोडच्या नया नगर भागात राहणाऱ्या प्रॉपर्टी एजंट पेसनवाज खान ( ३२ ) हा मुलाला शाळेत सोडून घरी जात असताना परिचयातील फैजल हा भेटला . घाबरलेल्या फैजल याने सांगितले कि त्याचा मित्र सकुर याचा कनकिया स्टार बाजार समोर एक भूखंड असून त्यात ठेवलेला भाडेकरू जागा रिकामी करत नव्हता. भूखंड रिकामी करण्याचे काम  निलेश सोनी याने करून दिले व त्या बदल्यात त्याला पैसे दिले . पण सोनी हा आणखी पैसे मागत आहे . 

पेसनावज याने सुकून याला घेऊन सोनीच्या कार्यालयात जाऊ सांगितले . त्याप्रमाणे सुकून व फैजल हे दोन लाख रुपये घेऊन पेसनवाज सह सोनीच्या पूनम गार्डन येथील कार्यालयात गेले .  तेथे सोनी नसल्याने परत फिरले व पुन्हा काही वेळाने त्याच्या कार्यालयावर गेले . तेव्हा सोनी याने सुकूर ला कॉल केला व भूखंड रिकामी करून दिल्या बद्दलचे उर्वरित पैश्यांची मागणी करत शिवीगाळ केली . तेव्हा पेसनवाज याने मोबाईल घेतला असता सोनी याने सुकूरने १० पेटी आणले आहेत का ? अशी विचारणा केली . 

त्या नंतर पेसनवाज , सुकुर व फैजल हे तिघे तेथून निघाले व सुकूर याच्या भूखंडावर पोहचले . तेव्हा रस्त्याच्या बाजूला बऱ्याच दुचाकी आणि सोनी याची फॉर्च्युनर गाडी दिसली . टोळी पाहून सुकूर घाबरून पळून गेले . तर सोनी याचे साथीदार इरफान मचाव ग्रुप , गोविंद, अन्वर, तौकीर व २० ते २५ गुंड पेसनवाज जवळ आले . इरफान याने गुप्तीने पेसनवाज च्या डोक्यावर वार केला तर गोविंद याने चाकूने पाठीत वार केले . तर अन्य साथीदारांनी लाकडी बांबू , दगड आदीने मारहाण केली . सुकूरच्या गाडीच्या काचा फोडल्या . वसीम हा पेसनवाज याला वाचवण्यास मध्ये पडला तर राडा पाहून लोकांची गर्दी जमू लागल्याने गुंडानी तेथून पोबारा केला . मीरारोड पोलिसांना ह्या घटनेची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहचले . पेसनवाज याला रुग्णालयात दाखल केले . पोलिसांनी निलेश सोनी सह त्याचे साथीदार असे एकूण २५ ते ३० जणांवर विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे . एकास अटक केली असून सोनी सह अन्य आरोपीं सह गुन्ह्यात वापरलेली वाहने , हत्यारे आदींचा शोध पोलीस करत आहेत .  

सोनी हे माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचे समर्थक मानले जातात . परंतु  मोठ्या रकमेच्या बदल्यात भूखंड रिकामी करून देण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्या कडून केले जात असल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे . ह्या आधी देखील सोनी वर गुन्हे दाखल आहेत . कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला सुद्धा सोनी याने दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल होता .   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर