शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

रवी पुजारीविरुद्ध तीन जिल्ह्यात चालणार खटले; नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची सरकारकडून नियुक्ती

By अझहर शेख | Published: July 20, 2022 3:38 PM

Ravi pujari : या सर्व खटल्यांसाठी सरकारपक्षाकडून बाजू मांडण्याकरिता अजय मिसर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. 

नाशिक : छोटा राजनचा हस्तक कुविख्यात आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारीच्या सर्व खटल्यांमध्ये नाशिकचे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाकडून काही दिवसांपुर्वीच काढण्यात आली आहे. 

खंडणी वसुलीसाठी खून करणे, सुपारी घेऊन खून करणे,  खूनाचा प्रयत्न, खंडणी मागणी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या कुविख्यात रवी पुजारी यास सेनेगलमधून २०२०साली भारतात आणण्यात आले आहे. लवकरच त्याच्यावरील मोक्कासह राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील प्रलंबित खटल्यांच्या नियमित न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार आहे. मुंबई, ठाणे व नाशिक या तीन जिल्ह्यांतील जिल्हा सत्र न्यायालयात पुजारीविरुद्धच्या खटल्यांची सुनावणी चालणार आहे. या सर्व खटल्यांसाठी सरकारपक्षाकडून बाजू मांडण्याकरिता अजय मिसर यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुजारी याने अनेक बिल्डर-डेव्हलपर्स, व्यापारी सीनेअभिनेते सेलेब्रेटिज यांचा खून करणे, खूनाचा प्रयत् करणे, खंडणी उकळणे यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. पुजारी हा परदेशांमधून त्याच्या संघटित गुन्हेगारीचे ‘नेटवर्क’ राज्यात चालवित होता. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या पथकांना तो वारंवार गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला जाळ्यात घेतले. पुजारीचे प्रत्यार्पण प्रक्रियेतदेखील मिसर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यास फेब्रुवारी २०२० साली सेनेगलच्या दकार येथू न सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पाडून भारतात आणण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhota Rajanछोटा राजनRavi pujariरवि पूजारीPoliceपोलिसadvocateवकिलNashikनाशिक