डोंबिवली: महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील कोनगाव परिसरात वीज चोरांविरुद्ध मोहिम सातत्याने सुरू आहे. गुरुवारी पून्हा १८ जणांविरुद्ध ४ लाख ६७ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी वीज कायद्यानुसार, भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
किशोर गुलाम पाटील, जगदीश गुलाम पाटील राहणार गोवेगांव, ता. भिवंडी, सिद्धार्थ दादाजी वाघ, सुमित अशोक शिंदे, राम विजय यादव, सतिश सरदो भागले, ओंकार दिद्दी (वापरकर्ता श्रीदेवी रेड्डी), महादेव दृष्टी सोसायटी सचिव, साई सुरेश कोल्हे, प्रकाश विसपुते, माधुरी विकास कराळे, विनोद मिश (वापरकर्ता रमेश काशिद), प्रकाश गोळीपकर (ओम साईराम कन्स्ट्रक्शन), वामन श्रावण पवार, अशोक विश्वनाथ सिंह, संजय मुंढे, सन्नी वर्मा, रमेश इंद्र सिंह सर्व राहणार कोनगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर केल्याचे आढळून आले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी ३७ जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता अभिषेक व्दिवेदी व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.