शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अबब! दिल्लीत IGT एअरपोर्टवर सापडली कोट्यवधीची रोकड; IT अधिकारी मोजून मोजून दमले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 1:24 PM

घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली. नोटांबाबत आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर चेकिंगवेळी CISF नं एका व्यक्तीला तब्बल ३.७ कोटीची रोकड घेऊन जाताना ताब्यात घेतले. रोकड एअरपोर्टच्या कार्गो टर्मिनलहून जप्त केली. आरोपीनं पैसे एका पेटीत भरले होते. सुरुवातीच्या तपासानंतर हे प्रकरण आयटी विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. IT टीम आता इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड कुठून आणली आणि कोणत्या कामासाठी त्याचा वापर केला जाणार होता याची चौकशी करत आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर रविवारी एका कार्गो पॅकेजला स्कॅन करताना त्यात मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचं समोर आले. एअरपोर्टवरील सुरक्षा रक्षकांनी जेव्हा हे पॅकेज उघडले तेव्हा त्यांचे डोळे दिपले. पॅकेजमध्ये नोटांचे खूप सारे बंडल होते. मोठ्या प्रमाणात कॅश असलेली जप्त केली त्यानंतर त्याची मोजणी सुरू केली. 

कॅश मोजल्यानंतर ती जप्त केलेली रोकड ३.७ कोटी रुपये असल्याचं सोमवारी कळवण्यात आले. घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली. नोटांबाबत आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत आहेत. या नोटा दिल्लीहून केरळला नेल्या जात होत्या. दिल्लीतील एका कंपनीने केरळच्या कंपनीला ही कॅश पाठवली होती. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. या लोकांची सुरक्षा एजेंसी, स्पेशल सेल आणि दिल्ली पोलीस संयुक्तपणे चौकशी करत आहेत. 

लाखोंचे दागिने जप्तयाआधी १४ जानेवारीला दिल्ली एअरपोर्ट आणि विजिलेंस टीमने संयुक्त ऑपरेशन करत विविध एअरलाइन्सच्या ८ लोडर पकडले होते. त्यांच्याकडून १५ लाखांचे दागिने, घड्याळ, आयपॅड इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींची चौकशी केली ते सर्व एअरपोर्टवर चोरी करायचे. तपासातून एअरपोर्टवर झालेल्या चोरीची प्रकरणांचा खुलासा झाला. या आरोपींनी चोरीसाठी एअरपोर्टवर गँग बनवल्याचं DCP रविकुमार सिंह यांनी माहिती दिली.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स