रायपूर - जुगाराचा नाद कुठल्याही व्यक्तीला बरबाद करू शकतो. अशीच एक घटना छत्तीसगडमधील रायपूर येथून समोरआली आहे. येथे जुगारामुळे एका मोटार कंपनीत कॅशियर असलेल्या एका व्यक्तीने कंपनीला १८ लाखांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. या कॅशियरचे नाव अजय गुप्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आता कंपनीने अजय गुप्ताविरोधात तक्रार दिली आहे. तसेच पोलीस अजय गुप्ताचा शोध घेत आहेत. कॅशियरने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. आता आरोपी कॅशियर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिवनाथ मोटर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये अजय गुप्ता कार्यरत होता. त्याने लाखो रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. रोख रक्कम जमा करणाऱ्या ग्राहकांकडून तो पावती द्यायचा. मात्र नंतर ती पावती रद्द करायचा.
अशा प्रकारे आरोपी अजय गुप्ताने कंपनीची एकूण १८ लाख ३४ हजार ५५० रुपयांची रक्कम उडवली होती. सध्या पोलिसांनी शिवनाथ मोटर्सच्या व्यवस्थापकीयसंचालकांच्या तक्रारीनुसार अजय गुप्ताविरोधात अफरातफरीचा गुन्हा नोंद केला.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीच्या अकाऊंटचे डिटेल तपासले तेव्हा सदर कॅशिअरने रमीसारख्या ऑनलाईन गेमवर पैसे गमावल्याचे दिसून आले. लाखो रुपये ऑनलाईन गेमवर पैसे लावण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.