सीबीआयने सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची सूत्रे हाती घेतल्यापासून एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे झाले आहेत. याप्रकरणी एनसीबीने रियासह १० जणांना अटक केली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक टीमसमवेत सीबीआयच्या पथकाने सुशांत सिंग राजपूत यांच्या वांद्रे फ्लॅटचीही अनेक वेळा तपासणी केली आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या गच्चीवर जाऊन पाण्याच्या टाकीची आणि इतर गोष्टींची सीबीआय आणि फॉरेन्सिक टीमने तपासणी केली आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या फ्लॅटच्या टेरेसच्या रहस्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
सीबीआयची टीम दिल्लीतील एम्स रुग्णालयातील फॉरेन्सिक टीमसोबत क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी दोन ते तीन वेळा सुशांतच्या फ्लॅटमध्ये गेली होते. तसेच टीम टेरेसवर देखील तपासासाठी गेली होती. उघड झालेल्या नवीन माहितीनुसार, सीबीआय आणि फॉरेन्सिक पथक अनेकदा सुशांत सिंग राजपूतच्या टेरेसवर जाताना दिसलं. त्या मार्गाने कुणी सुशांतच्या घरात प्रवेश केला होता का किंवा तिथे आणखी काही पुरावे मिळतात का, याचा शोध ते घेत असल्याचं समजतं. सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट असलेली माउंट ब्लाँक हि दुमजली इमारत आहे, त्यावर टेरेस आहे. इमारतीच्या चौकीदाराने सांगितले आहे की, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या घरी जाताना कोणीही दिसले नाही. त्याचबरोबर हेही समोर आले आहे की, या फ्लॅटला मागील बाजूस एक छोटासा गेटही आहे, तिथे एकही गार्ड नाही, अशी बॉलिवूडलाईफ.कॉमने माहिती दिली आहे. सीबीआय पथक याचा पुरावा शोधत आहे
सीबीआयच्या टीमला असे वाटत आहे की, जर हत्या करणाऱ्याने सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवरुन प्रवेश केला असेल तर त्याने काही पुरावा मागे सोडला असावा. सुशांतला ठार करण्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा काही भाग असावा किंवा छतावरून प्रवेश घेतलेल्या व्यक्तीशी संबंधित असे काही पुरावे टेरेसवर असू शकतात.
14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. तर त्याच्या निधनाच्या एक आठवडाआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने मुंबईतील एका बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतची आत्महत्या आणि दिशाच्या आत्महत्ये मागे काही कनेक्शन आहे का, हे तपासले जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक
रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?
आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय
कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली
हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल
बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले
दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला
भरदुपारी पार्क करुन ठेवलेल्या दुचाकीच्या डिकीतून रोकड लंपास करणारा जेरबंद