शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

अटक नको तर १ कोटी रुपयेच हवेत, तेही आताच हवेत; व्यापाऱ्याने ५० लाख दिले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 6:57 AM

मुंबईस्थित श्री बुलियन कंपनीच्या एका तपासाप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक धीरेन्द्र कुमार याने सोने व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कार्यालयातून उचलले आणि त्याला सीजीएसटीच्या कार्यालयात आणले.

मनोज गडनीस मुंबई : मुंबईत सीबीआयने केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात (सीजीएसटी) कर चुकवेगिरी विरोधी विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या धीरेन्द्र कुमार विरोधात एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीबीआय त्याचा शोध घेत आहे.

घटना काय आहे ?मुंबईस्थित श्री बुलियन कंपनीच्या एका तपासाप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक धीरेन्द्र कुमार याने सोने व्यापार करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कार्यालयातून उचलले आणि त्याला सीजीएसटीच्या कार्यालयात आणले. तिथे त्याला ५ तास बसवून ठेवले. त्यानंतर त्याला अटक करण्याची धमकी दिली. अटकेची कारवाई टाळायची असेल तर त्याने त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. 

सेटलमेंट कशी झाली ?अटक नको तर एक कोटी रुपयेच हवेत आणि तेही आताच हवेत, या मागणीवर धीरेन्द्र कुमार ठाम होता. मात्र, ताब्यात असलेल्या व्यापाऱ्याने कसेबसे त्याला ५० लाख रुपयांपर्यंत खाली आणले. ५० लाखांपैकी २५ लाख आता दोन तासांत देतो आणि उरलेले २५ लाख उद्या सकाळी देतो, असे सांगितले. या पैशांची व्यवस्था करण्यासाठी एका मित्राला फोन करू देण्याची विनंती या व्यापाऱ्याने धीरेन्द्र कुमारला केली. मग या व्यापाऱ्याने व्हॉटस्ॲपवरून आपल्या मित्राला फोन केला आणि पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले.

...असा अडकला अधिकारीसीजीएसटी कार्यालयात दबावाखाली असलेल्या मित्रासोबत अधिकाऱ्याच्या लाचखोरीसंदर्भातील हे बोलणे त्याच्या मित्राने समोर एक फोन लपवून त्यात त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. हेच व्हिडीओ रेकॉर्डिंग त्याने सीबीआयला दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये पुरावा म्हणून जोडले.हा व्हिडीओ तसेच या व्यापाऱ्याला जारी केलेल्या समन्सवर असलेली धीरेन्द्र कुमारची स्वाक्षरी, या व्यापाऱ्यासोबत कार्यालयात येतानाचे सीसीटीव्ही फुटेज अशा गोष्टींची पडताळणी करून सीबीआयने धीरेन्द्र कुमार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. 

चर्चगेट स्टेशनजवळ एक करड्या-निळ्या रंगाची हीरो ग्लॅमर बाइक उभी असेल. त्याचा नंबर एमएच-०१-ईजी-१०२३ हा आहे. या बाइकवर दोन जण असतील. त्यांच्याकडे पैशांची बॅग द्यायची आणि निघून जायचे. त्यांच्याशी बोलायचे नाही. २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळताच बाइकस्वार सुसाट तिथून निघून गेले. 

साथीदार कोण ?अनेक अधिकारी लाचेचे पैसे स्वतः स्वीकारत नाहीत. त्याकरिता त्यांची खास माणसे नेमलेली असतात. या प्रकरणात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जो तपास केला त्यात अँटॉप हिल परिसरात मुकेश ज्वेलर्स या दुकानाचा मालक असलेला अमृतपाल संखाला आणि त्याच्या दुकानातील कर्मचारी बबन हे दोघे सहभागी असल्याचे आढळून आले. हेच दोघे बाइकवरून पैसे घेण्यासाठी चर्चगेट स्टेशनजवळ आले होते. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरु केला आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग