विधानसभा निवडणुक संपून पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुन्हा सरकार स्थापन होताच पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली आहे. या नंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले आहे. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत. (The Central Bureau of Investigation (CBI) arrested ministers Firhad Hakim and Subrata Mukherjee, TMC MLA Madan Mitra, and former Kolkata Mayor Sovan Chattopadhyay in the Narada bribery case on Monday.)
तृणमूल काँग्रेसच्या चारही नेत्यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजताच बंगालच्या राजकारणात भूकंप आला आहे. नेत्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु झाले आहे. यातच ममता या सीबीआय कार्यालयात गेल्या आहेत. या साऱ्या घडामोडींमध्ये सीबीआयचे अधिकारी ममतांच्या मंत्र्यांची चौकशी करत आहेत. सीबीआयच्या टीमने सोमवारी सकाळी परिवाहन मंत्री आणि कोलकाता नगर पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला. थोडा वेळ शोध घेऊन हकीम यांना सीबीआयने उचलले. तेव्हा हकीम यांनी आपल्याला नारदा घोटाळ्यात अटक केले जात असल्य़ाचे सांगितले. यामुळे त्यांच्या समर्थकांनी हकीम यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली.