नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्य्क आयुक्त दीपक पंडित यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पंडित यांच्याकडे जवळपास ४ कोटींची बेहिशेबी मालमत्ता आहे. उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता त्यांच्याकडे आली कुठून याचा सीबीआय तपास करणार आहे.
दीपक पंडित यांनी २००० ते २०१४ दरम्यान पंडित यांनी ३. ९६ कोटींची मालमत्ता कमावली आहे. याचा तपास सीबीआय करणार आहे. सीबीआयने पंडित यांची पत्नी आरुषी आणि देवांश, आशुतोष या दोन मुलांना देखील आरोपी बनवले आहे. आपल्या पदाचा गैरवापर करत ही कोट्यवधीची मालमत्ता जमवत त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांशी देखील त्यांचे खास लागेबांधे आहेत.
भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणाऱ्या ‘कस्टम’च्या अधिकाऱ्यांची बदली !
चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अशोक पंडित यांच्याशी दीपक पंडित यांचे जवळचे संबंध आहेत. सीबीआयने दीपक पंडित यांच्या कुटुंबाच्या ७ विविध मालमत्त्यांवर टाच आणली आहे. ७ ठिकाणांपैकी ६ मुंबईतील ठिकाणं आहेत तर १ ठिकाणं हे भुवनेश्वर येथील आहे. १९८५ साली दीपक पंडित हे सीमाशुल्क विभागात रुजू झाले. त्यानंतर २०१४ साली पदोन्नती मिळाल्याने ते सहाय्यक आयुक्त बनले आणि सध्या ते भुवनेश्वर येथे कार्यरत आहेत.