मुंबई - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची सीबीआयच्या पथकाने सलग दुसऱ्यादिवशी आठ तासाहून अधिक काळ चौकशी केली. सांताक्रुज येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी दुपारपासून रात्री पावणे नऊपर्यंत चौकशी करण्यात आली. मात्र, अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने तिला रविवारीही बोलाविण्याची शक्यता आहे.
तिच्यासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचे आजी माजी सीए श्रीधर आणि रजत मेवानी, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी , नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग यांच्याकडेही चौकशीचा फेरा कायम ठेवण्यात आला आहे. सुशांतच्या पैशाचा त्यांच्याकडून झालेला वापर, 15 कोटी रक्कम वर्ग केल्याबद्दल विचारणा करण्यात आली. काहीवेळा सर्वांना समोरासमोर बसवून त्याच्याकडून प्रश्नातरे करण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी रियाकडे दहा तास चौकशी करून सोडण्यात आले होते. शनिवारी तिला पुन्हा पाचारण करण्यात आले. मात्र तिला व तिच्या कुटूंबियांना धोका असल्याच्या शक्यतेने सीबीआयने त्यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्याची सूचना मुंबई पोलिसांना केली होती. त्यानुसार त्यांना एक पोलीस एस्कॉट पुरविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास बंदोबस्तासमवेत रिया डीआरडीओच्या कार्यालयात पोहचली. तिच्याकडे सुशांतने केलेला आर्थिक व्यवहार, खर्च आणि ड्रगसेवनाबाबत सविस्तर विचारणा करण्यात येत होती.रात्री पावणे नऊपर्यंत चौकशी सुरु होती. एसपी नूपुर प्रसाद आणि तीन इंस्पेक्टर रियाची चौकशी करत आहेत. तर एसपी अनिल यादव हे शोविक चक्रवतीची चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारी रियाला विचारण्यात आलेले प्रश्न असे - *८ जूनला घर सोडून जाण्याचे कारण काय?* ८ ते १४ जूनपर्यंत त्याच्याशी संपर्क केला होता का? का केला नाही?* त्याच्या मेसेजला का रिप्लाय दिला नाहीस? मोबाईल नंबर ब्लॉक का केला होता?*सुशांतला तू कोणते ड्रग्स द्यायची? *सुशांतला कोणता आजार होता?*त्याला उपचारासाठी तू सुशांतला कोणत्या डॉक्टरकडे नेलं? *सुशांतच्या आजाराबाबत त्याच्या घरच्यांना का नाही सांगितलं? * सुशांतला दिलेले ड्रग कोण पुरवायचे?
अन्य महत्वाच्या बातम्या...