मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण व्यावसायिक पद्धतीने करण्यात आला आहे, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. मुंबई एका वृत्तवहिनीतर्फे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेला तपास व त्याबाबत झालेल्या आरोपाबाबत प्रथमच भूमिका जाहीरपणे मांडली.
...अखेर गुरख्याच्या खुनाचा उलगडा, मुलीच्या छेडछाडीच्या संशयावरून केला हल्ला
ते म्हणाले,' मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सर्व शक्यता गृहीत धरून व्यवसायिक पध्दतीने तपास केला होता. एसीपीपासून माझ्यापर्यतच्या सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोष्टी तपासून तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत होते.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आमच्याकडील गुन्हा सीबीआय कडे वर्ग न करता बिहार मधील दाखल गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे सोपवित मुंबई पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे सूचना केल्या. वास्तविक कोणत्याही 'एडीआर' बाबत पूर्ण तपास करून कोर्टात अहवाल सादर करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र काहीनी व मीडियाने विपर्सत मांडणी करून मुंबई पोलिसांवर आक्षेप घेतले. परंतु सीबीआयचा तपासही आमच्यापेक्षा वेगळा नसेल,याची मला खात्री आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत अधिक स्पष्टपणे बोलता येईल.