भ्रष्टाचार प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे तसेच कुंदन शिंदे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार आहे. न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) चा अर्ज स्वीकारला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीत ठेवण्याची विनंती करण्यात आली होती.मनी लाँड्रिंग प्रकरणात एनसीपीचे ज्येष्ठ नेते देशमुख आणि त्यांचे दोन सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे सध्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करत सुरु असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी पी सिंघाडे यांच्यासमोर अर्ज दाखल केला.