सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-१ शास्त्रीनगर परिसरात भर रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, एकच खळबळ उडाली. अखेर जागे झालेल्या उल्हासनगरपोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर साथीदारांनाचा शोध घेत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकारने सर्वस्तरातून टीकेची झोळ उठून पोलिसांच्या कार्यशमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. अश्या हुल्लडबाज व गुन्हेगारीवृत्तीच्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून झाली. अखेर उल्हासनगर पोलिसांनी काही तरुणाची धरपकड सुरू केली. सहायक पोलिस आयुक्त डी टी टे टेळे यांनी आतांपर्यंत दोन जणांना अटक करून इतरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती दिली. शहरात पोलीस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून हाणामारी, चोरी, फसवणूक, चाकू हल्ला, महिलांची छेड आदी गुन्ह्यात वाढ झाल्याचे बोलले होत आहे.
शहरात रात्रीच्या १० नंतर मुख्य रस्ते, चौक, गार्डन, मैदान, शासकीय कार्यालयाचें प्रांगण, नशेखोर, गर्दुल्ले, हुल्लडबाज तरुणांचा अड्डे झाली असून त्यांची दहशद निर्माण झाल्याचे चित्र शहरात आहे. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी शहरातील कायदा व सुव्यवस्थे बाबत ठराव करून शासनाकडे पाठविल्याने एकच खळबळ उडाली