शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पुण्यात सोनसाखळी चोरट्यांचा हैदोस, सहा ठिकाणी महिलांचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 10:57 AM

पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी सकाळी सोनसाखळी चोरट्याच्या टोळीने एकच हैदोस घातला आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या गुन्ह्यांमुळे पोलीस दल खडबडून जागे झाले असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात येत आहे

ठळक मुद्देपुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी (6 मे) सकाळी सोनसाखळी चोरट्याच्या टोळीने एकच हैदोस घातला आहे. चोरट्यांनी सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ महिला नागरिकांना प्रामुख्याने लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. शहरात सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आली असून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे.

पुणेपुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी (6 मे) सकाळी सोनसाखळी चोरट्याच्या टोळीने एकच हैदोस घातला आहे. एका पाठोपाठ घडलेल्या या गुन्ह्यांमुळे पोलीस दल खडबडून जागे झाले असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात येत आहे. चोरट्यांनी सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्याने लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. वानवडीतील जगताप चौक - ७.३० वाजता, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडे तालीम येथे ७.४५ वाजता  व फडके हॉलजवळ ८.४५ वाजता,  समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार पेठेतील खडी मैदान येथे ८.१० मिनिटांनी,  बिबवेवाडीतील रेवती अपार्टमेंटजवळ ८.३० वाजता फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरसीएम कॉलेजजवळ ८.४५ वाजता अशा ६ ठिकाणी ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दानिगे हिसकाविण्यात आले. 

गेल्या वर्षी वटपोर्णिमेला सोनसाखळी चोरट्यांच्या एका जोडगळीने संपूर्ण पुणे शहरात काही तासांत १४ ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रकार केला होता. त्यानंतर आता एका पाठोपाठ ६ ठिकाणी मंगळसूत्र हिसकाविली गेले आहे. शहराच्या मध्य वस्तीत सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. कुमुदिनी शशिकांत ढोंबरे (वय ६५, रा. अ‍ॅम्बीयन्स अपार्टमेंट, सदाशिव पेठ) या सकाळी स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी जात होत्या. फडके हॉलसमोर मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅमचे गंठण हिसकावून नेले.

विमल नागनाथ फुलसागर (वय ६७, रा. शनिवार पेठ) या लक्ष्मी रोडवरुन लोखंडे तालीमकडे जात असताना हगवणे चाळीसमोर त्या आल्या असताना मोटरसायकलवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे गंठण हिसकावून नेले. चोरट्यांनी सर्वप्रथम वानवडी येथील जगताप चौकातून पायी जाणाऱ्या  महिलेच्या गळ्यातील २ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. त्यानंतर ते बिबवेवाडी परिसरात आले. बिबवेवाडी येथील कॅनरा बँकेजवळून एक ज्येष्ठ नागरिक महिला पायी जात होती. तिच्या गळ्यातील २ तोळ्याचे दागिने हिसकावून नेले. या अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्या घाबरुन घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याचा माहिती दिली. 

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडीचे मैदान येथे त्यानंतर ८३ वर्षाच्या नलिनी उनवणे यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांचे दागिने हिसकावून नेले. सुमारे एक तासांमध्ये चोरट्यांनी सहा ठिकाणी महिलांचे दागिने लुटले. मात्र, या घटनांची माहिती पोलिसांना उशिरा समजली. जेव्हा समजली तोपर्यंत चोरटे आपले काम करुन पसार झाले होते. शहरात सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आली असून सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी