बदलापूर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या संभाजी भोसले याने पत्नी आणि दोन मुलांवर विषप्रयोग करून स्वत: फरार झाला आहे. यात पत्नीचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर आजारी आहेत. ज्यावेळेस विष पाजले, त्यानंतर दोन दिवस रुग्णालयात होते. त्यानंतर, घरी आल्यावर तिघांची प्रकृती पुन्हा बिघडली, हे नेमके कशामुळे घडले, याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.मुलाने दिलेल्या जबानीत वडिलांनीच शीतपेय दिल्याचे स्पष्ट केले. मात्र, या मुलांना ज्या वेळेस विष देण्यात आले, त्या वेळेस त्यांच्यावर दोन दिवस उपचार करून सोडण्यात आले. रुग्णालयातून सोडल्यावर पुन्हा त्या मुलांना आणि त्यांच्या आईला त्रास झाल्याने नंतर नेमके काय घडले, याचा तपास करणे आव्हानात्मक आहे.संभाजी याने ज्या दिवशी विष दिले, त्या दिवशी या दोन्ही मुलांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर दोन दिवस उपचार केल्यावर त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले.या दोन मुलांसह त्यांची आई लक्ष्मी यांनाही विष देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. मात्र, रुग्णालयातून उपचार घेऊन गेल्यावर पुन्हा या तिघांना त्रास झाला आणि त्यात लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संभाजी याचा शोध घेण्यासाटी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
मृत्यूचे गूढ सोडवण्याचे पोलिसांपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:18 AM