शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

चांदीवाल आयोगात गाठीभेटी अन् मोबाइलवर निर्बंध; अनिल देशमुखांवर कारागृह शासनाची बंधने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 8:36 AM

पत्राची प्रत आयोगातर्फे देशमुख आणि पालांडे यांना आज ते आयोगात आलेले असताना देण्यात आली. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. 

मुंबई: न्या. कैलाश चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात असताना मोबाइल वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करता येणार नाही, नातेवाइकांना भेटता येणार नाही वा घरचे जेवतादेखील येणार नाही, अशी बंधने आर्थर रोड कारागृह प्रशासनाने घातली आहेत. 

आर्थर रोड कारागृहातून देशमुख आणि त्याचे तत्कालीन स्वीय सहायक संजीव पालांडे  यांना आयोगासमोर नेण्याचे व आणण्याचे काम जे पोलीस पथक करते त्या पथकास कारागृह अधीक्षकांनी पत्र दिले असून त्यात या बंधनांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. कारागृह अधीक्षकांच्या पत्राची एक प्रत आयोगाच्या कार्यालयास गुरुवारी देण्यात आली. या बंधनांची अंमलबजावणी पथकातर्फे केली जाणार आहे. पत्राची प्रत आयोगातर्फे देशमुख आणि पालांडे यांना आज ते आयोगात आलेले असताना देण्यात आली. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. 

एटीएसचा तो अहवाल आयोगास सादर-

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या चौकशीचा ८०४ पानांचा अहवाल एटीएसने आयोगास सादर केला आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेस