अलिबाग : रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच समुद्रातून वाहून चरस हे अमलीपदार्थाची पाकिटे आल्याची घटना गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान २०९.१३२ किलो ग्रॅमची ८ कोटी ३६ लाख ५२ हजार ८०० रुपये अंदाजे किमतीची १७५ पाकिटे वेगवेगळ्या समुद्रकिनारी आढळली आहेत. जिल्हा पोलिसांनी ही सर्व पाकिटे जप्त केली आहेत. मात्र वाहत येणारी ही अमलीपदार्थांच्या पाकिटांचे गूढ अद्याप उघड झालेले नाही. सेंट्रल एजन्सीकडूनही याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम अशी पाकिटे समुद्रकिनारी वाहत आल्याचे उघड झाले.
त्यानंतर रायगड जिल्ह्यात २७ ऑगस्टला श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे ९ पाकिटे १०.३८६ किलोग्रॅमची ४१ लाख ५४ हजार ४०० रुपये, २८ ऑगस्ट रोजी मारळ बंदरात ३० पाकिटे ३५.५४९ किग्राची १ कोटी ४२ लाख १९ हजार ६०० रुपये, दिघी सागरी येथील सर्वे सागर बंदरात २४ पाकिटे २६.७५१ किग्राची १ कोटी ७ लाख ४०० रुपये, २९ ऑगस्ट रोजी कोंडीवली बंदरात २८ पाकिटे ३३.२५५ किग्राची १ कोटी ३३ लाख २ हजार रुपये, दिवे आगार, आदगाव बंदरात ४६ पाकिटे ५५.६१४ कि.ग्रॅ.ची २ कोटी २२ लाख ४५ हजार ६०० रुपये, ३० ऑगस्ट रोजी रेवदंडा बंदरात कोर्लई, थेरोंडा येथे १९ पाकिटे २४.९०८ कि.ग्रॅ.ची ९९ लाख ६३ हजार २०० रुपये, ३१ ऑगस्ट रोजी अलिबाग नजीक आक्षी, श्रीवर्धनच्या नानीवली व श्रीवर्धन किनारी १९ पाकिटे २२.६६९ कि.ग्रॅ.ची ९० लाख ६७ हजार ६०० रुपये किमतीचे चरस वाहून आले होते.
कस्टम तसेच आयबीकडूनही तपाससमुद्रमार्गे पाण्यातून वाहत येणारी ही अमलीपदार्थांची पाकिटे नक्की कुठून येत आहेत याबाबत अस्पष्टता आहे. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मिळालेली पाकिटे जप्त केली. मात्र काही नागरिकांनी आपल्याकडे पाकिटे ठेवत ती विकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. मुंब्रा येथेही काही जणांना ही पाकिटे विक्रीस नेताना पोलिसांनी पकडले. समुद्रमार्गे आलेल्या अमलीपदार्थबाबत कस्टम व आयबीकडूनही तपास केला जात असल्याचे जिल्हा पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.