जमीर काझीमुंबई - गेल्या जवळपास सव्वा पाच महिन्यापासून महासंचालक पद अनुभविलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) गुरुवारपासून पुन्हा रिक्त ठेवण्यात आले आहे. संजय बर्वे यांची मुंबई आयुक्तपदी निवड केल्यानंतर राज्य सरकारने त्या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. त्याऐवजी अप्पर महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आता लोकसभा निवडणूकीनंतरच याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.एसीबीच्या गेल्या तीन वर्षात तब्बल २ वर्ष दीड महिना महासंचालक पद पूर्णवेळ अधिकाऱ्याविना रिक्तच राहिले आहे. गुरुवारी पुन्हा बर्वेंचा वारसदार न नेमल्याने या पदाची नियुक्ती राज्य सरकारकडून सोयीनुसार केली जात आहे, अशी चर्चा वरिष्ठ अधिकारी व पोलीस वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. वास्तविक सध्या पोलीस महासंचालक व मुंबईच्या आयुक्ता व्यतिरिक्त पाच महासंचालक कार्यरत आहेत. मात्र राज्य सरकारने सध्या यापैकी एकाचीही नियुक्ती या पदावर केलेली नाही. त्याचप्रमाणे दत्ता पडसलगीकर निवृत्त झाल्याने रिक्त झालेले महासंचालक पदी अन्य अधिकाऱ्याला बढती देण्याची तसदी घेतलेली नाही. मुंबई आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेले अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह हे पदोन्नतीसाठी दावेदार आहेत.राज्यातील लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घोटाळे, भ्रष्टाचाराच्या तपासाची जबाबदारी असलेला या विभागाचे प्रमुखपद हे पोलीस महासंचालकांनतरच्या जेष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविले जात होते. मात्र डिसेंबर २०१५ मध्ये राज्य सरकारने मुंबईचे आयुक्त पदाचा दर्जा वाढवून त्याठिकाणी बनविण्यात आले. त्यानंतर तत्कालिन होमगार्डचे महासमादेशक अहमद जावेद यांना आयुक्त बनविण्यात आले. त्यामुळे पोलीस महासंचालकांनंतर हे पद दुसऱ्या क्रमांकाच्या जेष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येवू लागली आणि त्यानंतर एसीबी डीजींचा पदाचा नंबर आला. मात्र त्यामध्येही राज्य सरकारने सोयीस्कर भूमिका घेतली आहे. २९ फेब्रुवारी २०१६ ला तत्कालिन प्रमुख विजय कांबळे हे रिटायर झाल्यानंतर तेथे अप्पर महासंचालक असलेल्या संजय बर्वे यांच्याकडून दोन महिने अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर सतीश माथूर यांची २५ एप्रिल २०१६ रोजी नियुक्ती करण्यात आली. ते ३० जुले २०१६ मध्ये पोलीस महासंचालक झाल्यानंतर तब्बल २५ महिने १६ दिवस हे पद रिक्त होते. त्यापैकी विवेक फणसाळकर यांनी दोन वर्षे अतिरिक्त कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांची ठाण्याला आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर दीड महिना अप्पर महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार होता. गेल्यावर्षी १८ सप्टेंबरला संजय बर्वे यांची त्याठिकाणी महासंचालक म्हणून नियुक्ती केली होती. गुरुवारी त्यांचा पदभार पुन्हा तात्पुरत्या स्वरुपात सेठ यांच्याकडे देण्यात आला आहे.एसीबीचे अतिरिक्त प्रभारी कालावधीसंजय बर्वे १ मार्च २०१५ ते २५ एप्रिल २०१६विवेक फणसाळकर ३० जुलै १६ ते ३० जुलै १८रजनीश सेठ २ आॅगस्ट १८ ते १८ सप्टेंबर १८रजनीश सेठ २८ फेब्रुवारी २०१९ पासूनराज्य पोलीस दलात सध्या सुबोध जायस्वाल व संजय बर्वे यांच्याशिवाय संजय पांडे ( होमगार्ड), बिपीन बिहारी (पोलीस गृहनिर्माण), एस.एन.पांडे ( सुधार सेवा), डी. कनकरत्नम ( सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे ( विधी व तंत्रज्ञ) हे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापैकी संजय पांडे हे बर्वे यांच्यापेक्षा एक वर्षांनी वरिष्ठ असले तरी त्यांना न हलविता राज्य सरकारने बर्वे यांची मुंबईची धुरा सोपाविली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार पुन्हा प्रभारीच्या खांद्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 8:34 PM
महासंचालकाची नियुक्ती नाही; सोयीनुसार नियुक्तीची पद्धत कायम
ठळक मुद्देराज्यातील लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घोटाळे, भ्रष्टाचाराच्या तपासाची जबाबदारी असलेला या विभागाचे प्रमुखपद हे पोलीस महासंचालकांनतरच्या जेष्ठ अधिकाऱ्याकडे सोपविले जात होते.आता लोकसभा निवडणूकीनंतरच याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी नेमण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. सतीश माथूर यांची २५ एप्रिल २०१६ रोजी नियुक्ती करण्यात आली. ते ३० जुले २०१६ मध्ये पोलीस महासंचालक झाल्यानंतर तब्बल २५ महिने १६ दिवस हे पद रिक्त होते.