शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

वीस वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल; शिरूर येथील धक्कादायक घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 19:39 IST

महिलेचा विनयभंग करून तिच्याकडून शारीरिक सुखाची केली होती मागणी..

न्हावरे : न्हावरे (ता.शिरूर) येथे वीस वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्याबरोबर लैंगिक सुखाची इच्छा व्यक्त करणाऱ्या डॉक्टरवर शिरूर पोलिसांनी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याच्या घटनेत न्हावरे येथील डॉ. रामहरी भुजंगराव लाड (रा.न्हावरे ता.शिरूर ) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेऊन अटक केले होते. दरम्यान, सोमवारी शिरूर न्यायालयात डॉ. लाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील वीस वर्षीय महिला काल (दि.९)पोटात दुखत असल्याने डॉ. लाड यांच्या नाथकृपा हाँस्पिटलमध्ये गेली असता डॉ. लाड यांनी तिच्याबरोबर मनात लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील वर्तन करुन  तिच्याबरोबर लैंगिक सुखाची इच्छा व्यक्त केली . यासंदर्भात संबंधित महिलेने आपल्या नातेवाईकांना कळविले . दरम्यान या घटनेची तक्रार संबधित महिलेने आज (दि १० ) शिरूर पोलिस ठाण्यात दाखल केलीअसता   . संबंधित महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी डॉ. रामहरी लाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे करत आहेत.

टॅग्स :ShirurशिरुरMolestationविनयभंगPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर