कारंजा लाड : संस्थेच्या आर्थिक व्यवहाराच्या आॅडिटमधील रिकव्हरीची रक्कम कमी करण्यासाठी प्रमाणीत लेखा परीक्षक सहकारी संस्था वाशिमचे लेखा परीक्षक संजय वसंतराव डेहणीकर यांनी ३ लाख ६० हजार रूपयाची लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागवाशिमच्या चमूने २२ जुन रोजी आरोपीस ताब्यात घेतली.
एका संस्थेच्या आर्थीक व्यवहाराचे आॅडिटमधील रिकव्हरीची रक्कम कमी करण्यासाठी संजय वसंतराव डेहणीकर (५२) यांनी तक्रारदारास ३ लाख ६० हजाराची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानुसार ८ ते १२ एप्रिल २०२१ दरम्यान पडताळणी केली. यावेळी लाचेची मागणी केल्याचे समोर आल्याने २२ जून रोजी पतसंस्थेच्या अध्यक्षांच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध कारवाइ केली. ही कारवाइ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक शंकर शेळके, सहायक पेालीस निरीक्षक नंदकिशोर परळकर, पोलीस नाईक विनोद अवगळे, योगेश खोटे, राहुल व्यवहारे यांनी केली. आरोपीविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला.