मुंबई : वैवाहिक संकेतस्थळावर ओळख करून घेऊन लग्नाच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली एल. टी. मार्ग पोलिसांनी पृथ्वीराज सावळे नावाच्या (२७) वर्षीय तरुणाला अटक केली. औरंगाबाद येथील घरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आधीच विवाहित सावळे याने पीडितेच्या प्रोफाइलमध्ये रुची दाखवत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांना एकमेकांचा बायोडेटा आवडला. मरीन लाइन्सच्या सीए फर्ममध्ये नोकरी करणाऱ्या पीडितेने सांगितले की, सावळेने तिला निम्म्या दरात आयफोन खरेदीची ऑफर दिली, म्हणून तिने त्याला ५२ हजार रुपये दिले. पैसे देऊनही फोन न मिळाल्याने तिने पोलिसात तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भोसले, सायबर डिटेक्शन अधिकारी प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल संतोष पवार व हवालदार झगडे यांच्या पथकाने तपास केला. सावळेने सुमारे १० मुलींचीही फसवणूक केली होती, असे पीडितेने सांगितले.
- पृथ्वीराज सावळे याने फसवणूक केली- सावळने यापुर्वी १० मुलींना फसविले- त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.- अशाचप्रकारे त्याने आणखी किती मुलींची फसवणूक केली, याबाबत पोलिस कसून शोध घेत आहेत. - आरोपी विविध प्रलोभने देऊन मुलींना जाळ्यात ओढायचा.