मुंबई - एटीएसने सलमान खान, फहाद शाह, झमेन कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयित आरोपींना मुंब्रा आणि औरंगाबाद येथून काल अटक केली असून त्यांच्याकडून हायड्रो पॅराऑक्साईड व काही घातक रसायने, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, धारदार चाकू, मोबाईल्स आणि सिम कार्ड्स पोलिसांनी हस्तगत केले आहे. झमेन हा मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह (एमआर) असून त्याला रसायनाबाबत अतिशय चांगली माहिती आहे. झमेनच्या मदतीनेच खाण्या - पिण्यातून घातक वा विषारी रसायन मिसळून हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. मुख्यतः कुंभमेळा हा या संशयित दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता. या नऊ संशयितांना औरंगाबादमधील न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. झमेनच्या मदतीनेच खाण्या - पिण्यातून घातक वा विषारी रसायन मिसळून हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. मुख्यतः कुंभमेळा हा या संशयित दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होता.
मोहसिनने त्याला रासायनिक हल्ला घडवून आणण्यासाठी आपल्या गटात एमआर असलेल्या झमेनला सामील करून घेतलं होतं. तसेच एटीएसने ताब्यात घेतलेल्या नऊजणांपैकी एकजण हा दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या रशिद मलबारीचा मुलगा असल्याचं उघड झालं आहे. खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून विषारी पदार्थ देऊन एखाद्या कार्यक्रमात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट त्यांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. या हल्ल्यासाठी या संशयित दहशतवाद्यांनी औरंगाबाद आणि मुंबईत घरातच लॅब बनविल्याचे देखील माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.