भिवंडी - तालुक्यातील राहनाळ गावात असलेल्या श्री दत्ता कंपाउड मध्ये पोलिसांनी मंगळवारी अवैधरित्या केमीकलचा साठा केलेल्या गोडाऊनवर छापा मारून पंधरा लाखाचा ज्वलनशील केमिकल साठा जप्त करून व्यापारी व मॅनेजर यांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राहानाळ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील श्रीदत्त कम्पाउंड मधील ज्वलनशील केमिकल पदार्थानी भरलेल्या तीन गोदामावर पोलिसांनी छापा मारून सुमारे १५ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला आहे . येथील गाळा नंबर अ-१७,अ-१८ आणि बी- ७ हे गोडाऊन नवी मुंबई येथील व्यापारी दत्ता सदाशिव देशमुख (६०) , देशमुख वेअर हाउसींग प्रा.लिं कंपनी उघडून त्या गोदामात शासनाची कोणतीही परवानगी न घेता अति ज्वलनशील केमिकल साठा मोठया प्रमाणात साठवून ठेवला होता. त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. याबाबत नारपोली पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक विक्रम विठ्ठल धडवई यांच्या कडे स्थानिकांनी तक्रार केली होती त्यानुसार नारपोली पोलिसानी गोदाम क्रमांक अ- १७ मध्ये केमिकलचे ६६ ड्रम, प्रत्येक ड्रम मध्ये २९० किलो वजनाचे त्याची किंमत ४ लाख ६२ हजार रुपये व गोदाम क्रमांक अ-१८ मध्ये केमिकल चे ५८ ड्रम प्रत्येक ड्रम मध्ये वजन २९० किलो वजन त्याची कीमत ४ लाख ६ हजार रुपये आणि गोदाम क्रमांक बी-७ मध्ये केमिकलचे ४२ ड्रम २९९ किलो वजनाचे व ४८ ड्रम १६१ किलो वजन ३ लाख ८४ हजार रुपए किंमत असे एकूण २१४ ड्रम केमिकलने भरले होते या सर्व केमिकल ची सुमारे किंमत १५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा ज्वलनशील केमिकल साठा पोलिसांनी जब्त करून गोदामाचे मैनेजर नंदकुमार कोड़ीराम चिकणे (४५) राहणार नवीं मुंबई व केमिकल व्यापारी दत्ता सदाशिव देशमुख (६०) राहणार नवीं मुंबई यांच्या विरोधात भादंवि कलम २८५,२८६,३४ प्रमाणे पर्यावरण सरंक्षण कायदा सन १९८६ चे कलम ६ ,८,२५ नुसार कलम १५ व मैन्युफक्चर स्टोरेज अँड इंक्पोर्ट आँफ हजार्डस केमिकल सन १९८९ अन्वेय १८ , पेट्रो कैमिकल अँक्ट सन १९३४ चे कलम ३,४,२३ व सन २००२ चे कलाम ११६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तसपास सहायक पोलिस निरीक्षक के.आर.पाटिल करत आहेत.