मूल होत नाही म्हणून दिरासह सासरा मारत होते टोमणे, वैतागून महिलेने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:29 IST2022-05-04T19:28:17+5:302022-05-04T19:29:46+5:30
Suicide Case : असाच काहीसा प्रकार छतरपूर येथील एका महिलेसोबत घडला, जिला मूलबाळ नव्हते, तिच्या घरचे लोक तिला वारंवार टोमणे मारत होते. या टोमणेला कंटाळून तिने आपला जीव संपवला.

मूल होत नाही म्हणून दिरासह सासरा मारत होते टोमणे, वैतागून महिलेने केली आत्महत्या
छतरपूर : समाजात असे काही लोक आहेत की, तुमच्यात काही वाईट किंवा कमतरता असेल तर लोक तुमची टिंगल करतात, टोमणे मारतात आणि अखेर त्या टोमण्याने नाराज होऊन चुकीचा निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार छतरपूर येथील एका महिलेसोबत घडला, जिला मूलबाळ नव्हते, तिच्या घरचे लोक तिला वारंवार टोमणे मारत होते. या टोमणेला कंटाळून तिने आपला जीव संपवला.
सासरे आणि दीर वांझ म्हणाले
वास्तविक, झारखंडमधून आलेल्या किरण कुमारीचा चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील मातगुवां पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रनगुंवा गावातील तरुणाशी विवाह झाला होता. किरणच्या लग्नाला चार वर्षे उलटली तरी आजतागायत मुले झाली नाहीत. त्यामुळे सासरे आणि दीर तिच्याशी रोज भांडण करत असत. घटनेच्या दिवशी सासरे आणि दिराने तिच्याशी भांडण केले आणि मुल होत नसल्याने तू वांझ असल्याचे सांगितले.
गॅंगरेप पीडितेवर पोलीस ठाण्यात सुद्धा पोलिसाने केला बलात्कार
त्यामुळे दुखावलेल्या किरण कुमारीच्या मनाला ही गोष्ट लागली आणि तिने सासरे आणि दीराच्या या कृत्याबद्दल पतीकडे तक्रार केली. या भांडणानंतर घरी परतल्यावर पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे मृत किरण कुमारीचे पती रामकुमार यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणी बिजावरचे एसडीओपी शशांक जैन यांनी सांगितले की, मृत महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.