शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

चोरीच्या तपासाला गेले अन् पाण्याच्या टाकीत मृतदेहाचे ६ तुकडे आढळले; पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 9:29 AM

आरोपीने २ महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केली होती. या आरोपात आता पोलिसांनी पतीला अटक केली आहे

बिलासपूर - देशात श्रद्धा वालकर हत्याकांड चांगलेच गाजले. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आरोपी आफताबनं ते वेगवेगळ्याठिकाणी पोहचले. या घटनेने सर्वांना हादरून टाकलं होते. असाच एका अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार छत्तीसगडच्या बिलासपूर इथं घडला आहे. याठिकाणी एका पतीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ६ तुकडे केले. इतकेच नाही तर आरोपीने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे टेप लावून पाण्याच्या टाकीत ठेवले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने २ महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केली होती. या आरोपात आता पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. घरात दुर्गंध पसरल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी घराची तपासणी केली तेव्हा पाण्याच्या टाकीत ६ तुकड्यात मृतदेह पाहताच पोलिसांना धक्काच बसला. या घटनेची चौकशी करत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. मृतदेहाचे तुकडे जमा करत पोलिसांनी ते पोस्टमोर्टमला पाठवले तर गुन्हेगाराची चौकशी सुरू आहे. 

नेमकं काय घडलं?गुन्हे शाखेच्या सायबर युनिटला सूचना मिळाली होती की, तखतपूर येथील पवनसिंह ठाकूर उसलापूर इथं भाड्याने राहायचा. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. हा युवक तखतपूरमधील चोरीत सहभागी होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. त्यानंतर पोलिसांनी युवकाच्या घरची झडती घेतली. तेव्हा घरात दुर्गंध येत असल्याचं पोलिसांना जाणवलं. तेव्हा पोलिसांनी टेरेसवरील पाण्याची टाकी पाहिली तर त्यात प्लॅस्टिकच्या बॅगला टेप लावून काहीतरी सामान लपवल्याचं दिसलं. 

पोलिसांनी ते सामान बाहेर काढले तेव्हा त्यात महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा २ महिन्यापूर्वी पत्नी सीता साहूची हत्या करून तिचा मृतदेह तुकडे करून पाण्याच्या टाकीत टाकल्याचं म्हटलं. आरोपी पतीने ही हत्या का केली? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत असून अद्यापही पोलिसांच्या प्रश्नांना टोलवाटोलवी करण्याचं काम आरोपी करत आहे. सध्या या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी