छत्तीसगढच्या (Chhattisgarh Crime News) कोरबामधून लग्न करून नव्या आयुष्याचं स्वप्न बघत संजय यादव नावाचा तरूण साखरपुडा करण्यासाठी आपल्या सासरी निघाला होता. तेव्हाच बातमी आली की, त्याची होणारी पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेने संजय इतका दु:खी झाला की, त्याने आत्महत्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्याची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे.
कोरबा जिल्ह्यातील भालू सटका नक्तखार येथे राहणारा संजय यादव याचं लग्न एका तरूणीसोबत ठरलं होतं. साखरपुड्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. ठरलेल्या तारखेनुसार १९ मार्चला साखरपुडा होणार होता. यानंतर २० मार्चला मंडप रिवाज सुरू करून २२ मार्चला लग्न होणार होतं. १९ मार्चला संजय साखरपुड्याला सासरी जाण्यासाठी तयार होत होता. तेव्हा समजलं की, त्याची होणारी पत्नी एका तरूणासोबत पळून गेली. संजयला याचा धक्का बसला. त्याला समजत नव्हतं की, आपल्या मित्रांना काय सांगणार?
लोक काय म्हणतील यांची चिंता त्याला सतावू लागली होती. त्याने लगेच असा विचार केला की, आता या जगात राहून फायदा नाही. अशात त्याने वडिलांच्या एक्स्पायर झालेल्या शुगरच्या १७ गोळ्या खाल्ल्या. घरातील लोकांना हे समजलं तर एकच गोंधळ उडाला.
संजयला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरूणी कटघोरा येथील राहणारी आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर संजयवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तो आता बरा आहे. तरूणाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच तरूणाचा जबाबदही नोंदवण्यात आला आहे.