नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी आज दिल्ली कोर्टाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी ईडीला अर्धा तास इतका कालावधी दिला आहे. तसेच ईडी उद्या चिदंबरम यांची तिहार तुरुंगातच चौकशी करणार आहे.दिल्लीच्या कोर्टाने ईडीला जर पी. चिदंबरम यांना चौकशी करून अटक केली तर ते चांगलं होणार नाही, असं ठणकावून सांगितले. ईडीने यापूर्वी चौकशी करुन त्याला न्यायालयात अटक करण्याची विनंती केल्याचे कोर्टाने सांगितले. विशेष न्या. अजय कुमार कुहार यांनी ईडीची याचिका मेनी करून १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेल्या चिदंबरम यांची चौकशी करण्यास मुभा दिली आहे. सीबीआयने चिदंबरम यांना राहत्या घरातून नाट्यमयरित्या अटक केली होती. ईडी कोर्टाकडून मुभा मिळाल्यानंतर उद्या तिहार कारागृहात चिदंबरम यांची चौकशी करणार आहे. ईडीने दाखल केलेल्या याचिकेत जर गरज लागल्यास चिदंबरम यांना अटक करू असे नमूद केले आहे.
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची उद्या ईडी तुरुंगात करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:21 PM
ईडीला अर्धा तास इतका कालावधी दिला आहे.
ठळक मुद्देईडीने दाखल केलेल्या याचिकेत जर गरज लागल्यास चिदंबरम यांना अटक करू असे नमूद केले आहे. सीबीआयने चिदंबरम यांना राहत्या घरातून नाट्यमयरित्या अटक केली होती.