मुंबई - ४८ तासात खऱ्या गुन्हेगाराला अटक करणाऱ्या पोलिस उपायुक्त विजय पाटिल व एसीपी संगीता पाटिल व त्यांच्या टीमचे काळाचौकी पोलिस ठाण्यात जावून मुंबईच्यामहापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रभाग समिति अध्यक्ष रमाकांत रहाटे, शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, व शाखाप्रमुख हनुमंत हिंडोले उपस्थित होते.
पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काळाचौकी पोलिसांनी ४८ तासांच्या आत या दोन महिन्याच्या बाळाची हत्या करणाऱ्या तिच्या निर्दयी आईला अटक केली.पोलिसांच्या बहादूर कामगिरीचा गौरव करत काल महापौरांनी गौरव केला.
यावेळी महापौर म्हणाल्या की, गुन्हेगार माता असो की अन्य तो गुन्हेगारच असतो. जन्माला आलेल्या आपल्या २ महिन्याच्या तान्हा बाळाची तिने हत्या केली ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती. माता कशी वैरी झाली याचा सर्व बोध समाजाने घेणे गरजेचे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि,११ रोजी घोडपदेव येथे २ महिन्याच्या बाळाच्या चोरीची घटना घडली. या घटनेमुळे विभागात चिंतेचे वातावरण पसरले होते. या संदर्भात नेमकी काय घटना घडली तसेच तपास यंत्रणा कशा रीतीने तपास करीत आहेत. यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व स्थानिक शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी पोलीस उपायुक्त विजय पाटील यांची काळाचौकी पोलीस ठाण्यात दि,१२ रोजी भेट घेतली होतो. यावेळी पोलीस उपायुक्तांनी लवकरात लवकर याचा तपास पूर्ण केला जाईल असे आश्वासन महापौरांना दिले होते आणि ४८ तासांच्या आत पोटच्या २ महिन्याच्या बाळाची हत्या करणाऱ्या आईची कसून चौकशी करून तिला काल अटक केली.