नवी दिल्ली : भारतातील चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधिक आकडेवारीने झोप उडविली आहे. अमेरिकेने भारतासोबत केलेल्या सहकार्य करारानुसार हे आकडे मिळाले आहेत. देशात गेल्या 5 महिन्यांत 25000 हून जास्त चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडीओ, फोटो विविध सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आले आहेत.
ही माहिती अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन (NCMEC) ने भारतीय राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाला दिली आहे. दोन्ही देशांनी ही माहिती शेअर करण्यासाठी गेल्या वर्षीच करार केला होता.
इंडियन एक्सप्रेने दिलेल्या वृत्तानुसार ही प्रकरणे सर्वाधिक दिल्लीमध्ये घडलेली आहेत. यानंतर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून हे व्हिडीओ, फोटो अपलोड केले जात आहेत. प्रत्येक राज्याचे वेगवेगळे आकडे समोर आलेले नसून सूत्रांनी सांगितले की, असे एकूण 1700 प्रकरणे महाराष्ट्रातून सायबर विभागाला पाठविण्यात आली आहेत. अन्य राज्यांमध्येही हीच परिस्थिती आहे.
गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार देशभरात आरोपींची धरपकड सुरू झाली असून नुकतीच महाराष्ट्रातही दोघांना अटक करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये सर्वाधिक प्रकरणे उघड झाली आहेत. मुंबईतच 500 प्रकरणे घडली आहेत.
कायद्यामध्ये काय म्हटलेय?पॉक्सो कायद्यानुसार आरोपींना अटक केली जाते. या कायद्यामध्ये पॉर्नोग्राफी अंतर्गत फोटो, व्हिडीओ, डिजिटल किंवा कॉम्प्युटरवर बनविण्यात आलेला फोटो जो खऱ्या मुलांसारखा वाटेल किंवा असा फोटो ज्याला मॉर्फ केलेला असेल हे प्रकार गुन्हा ठरविण्यात आले आहेत.