बीजिंग: इंटरनेट प्रोव्हायडर कंपन्यांचे दावे आणि वास्तव यात मोठा फरक आहे. म्हणजे कंपन्या ज्या स्पीडचा (Internet Speed) दावा करतात, तितका स्पीड सहसा लोकांना मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकवेळा लोक नाराज होऊन प्रोव्हायडर बदलत राहतात, पण चीनमध्ये एका व्यक्तीने असे काही केले ज्यामुळे एकच खळबळ उडाली. आता या व्यक्तीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, हा व्यक्ती एका इंटरनेट कॅफेमध्ये गेला होता, याठिकाणी इंटरनेटचे स्पीड खराब मिळत असल्याने, त्याने संतप्त होऊन इंटरनेट केबललाच आग लावली.
चिनी अधिकार्यांनी सांगितले की, लॅन असे टोपणनाव असलेल्या व्यक्तीला कमी स्पीडच्या इंटरनेट कनेक्शनमुळे संतप्त होऊन इंटरनेट उपकरणांना आग लावल्याप्ररकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लॅनने गेल्या वर्षी जूनमध्ये दक्षिण गुआंग्शी प्रांतातील एका इंटरनेट कॅफेला भेट दिली होती. खराब इंटरनेट स्पीडमुळे तो अस्वस्थ झाला आणि त्याने तेथे असलेल्या केबल्स आणि इतर उपकरणे जाळून टाकली.
जवळपास 50 तास इंटरनेट ठप्पखटल्याच्या सुनावणीदरम्यान अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, खराब इंटरनेटमुळे लॅन इतका संतापला की त्याने ऑप्टिकल फायबर नेटवर्क केबल असलेला सार्वजनिक बॉक्स नष्ट केला. त्याने पेपर नॅपकिन पेटवण्यासाठी लायटरचा वापर केला आणि नंतर टेलिकॉम बॉक्सला आग लावली. आगीमुळे, सार्वजनिक रुग्णालयासह सुमारे 4,000 घरे आणि कार्यालयांमध्ये 28 ते 50 तास इंटरनेट ठप्प झाले. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या लायटरसह लॅनला अटक केली. सार्वजनिक दूरसंचार सुविधांचे नुकसान केल्याप्रकरणी लॅनला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेची चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर खूप चर्चा होत आहे.