मुंबई - चीनमध्ये गृहपयोगी वस्तूंमध्ये सोने लपून भारतात तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) दोन चिनी नागरिकांसह चौघांना अटक केली आहे. आरोपींकडून 21 किलो सोने व 35 किलो चांदी हस्तगत करण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सात कोटी रुपये इतकी अाहे.वांग ग्युंगेन(वय 36), वेंग शुनझेन(वय 36), कमर अब्बास सय्यद(वय 33) यांच्यासह दहिसर येथील सराफ व्यवसायिक मिहिर मेहता यालाही याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहे. डीआयआरला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार डीआरआयने कारवाई करत अंधेरी पूर्व येथील मरोळ येथील फ्लॅटमधून वांग आणि वेंग या दोघांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून कुरिअर पार्सल हस्तगत करण्यात आले. आरोपींच्या चौकशीत ते दहिसर येथील ट्रू ज्वेलमध्ये केमिकलमध्ये सोने व चांदीच्या प्लेट वेगळ्या करत होते. या माहितीवरून ट्रू मेहताला अटक करण्यात आली. याप्रकरणी आयात निर्यात कोड पुरवणाऱ्या कमर सय्यद याचाही सहभाग आढळला. त्यानुसार डीआरआयने त्यांना अटक केली. वांग व वेंग हे दोघे चिनी कंपनीत कर्मचारी असून त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले आहे.
सात कोटींच्या सोन्या - चांदीच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या चिनी नागरिकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 9:21 PM
वांग व वेंग हे दोघे चिनी कंपनीत कर्मचारी असून त्यांच्या मालकाच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार झाल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले आहे.
ठळक मुद्देमहसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) दोन चिनी नागरिकांसह चौघांना अटक केली आहेवांग ग्युंगेन(वय 36), वेंग शुनझेन(वय 36), कमर अब्बास सय्यद(वय 33) यांच्यासह दहिसर येथील सराफ व्यवसायिक मिहिर मेहता यालाही याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहे आयात निर्यात कोड पुरवणाऱ्या कमर सय्यद याचाही सहभाग आढळला. त्यानुसार डीआरआयने त्यांना अटक केली.