पनवेल - घराची नोंदणी करण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या नवीन पनवेल येथील सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केल्याने पुन्हा एकदा सिडकोमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला आहे.सिडकोच्या नवीन पनवेल येथील कार्यालयात सहाय्यक वसाहत अधिकारी म्हणून काम करणारे सागर तापडीया यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने खरेदी केलेला घर स्वताच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी सिडको कार्यालयात गेले असता सहाय्यक वसाहत अधिकारी तापडीया यांच्यासाठी काम करणारा खासगी एजंट रविंद्र छाजेड ( ५४) याच्या मध्यस्तीने ५० हजार रूपयांची मागण केली होती. १ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक रमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून संबंधित या लाचप्रकरणाची तक्रार केली होती. रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानूसार सोमवारी सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास सापळा रचून कार्यालयातच ५० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे असून या प्रकरणात सहाय्यक वसाहत अधिकारी सागर मदनलालजी तापडीया ( ४७), खासगी एजंट रविंद्र छाजेड या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
सिडकोचा सहाय्यक वसाहत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 8:08 PM
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केल्याने पुन्हा एकदा सिडकोमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला आहे.
ठळक मुद्देसहाय्यक वसाहत अधिकारी तापडीया यांच्यासाठी काम करणारा खासगी एजंट रविंद्र छाजेड ( ५४) याच्या मध्यस्तीने ५० हजार रूपयांची मागण केली होती. सहाय्यक वसाहत अधिकारी तापडीया यांच्यासाठी काम करणारा खासगी एजंट रविंद्र छाजेड ( ५४) याच्या मध्यस्तीने ५० हजार रूपयांची म ५० हजार रूपयांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या नवीन पनवेल येथील सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले.